
हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे /- नगरपंचायत अंतर्गत शहरातील जवळपास तिनशे ते चारशे लाभार्थ्यांनी घरकुलाचे बांधकाम पूर्ण केलेले आहे. सदर लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजना शहरी (घरकुल) योजनेचा अंतिम (चौथा) हप्ता नगरपंचायत मार्फत अद्याप वितरित करण्यात आलेला नाही. त्यामुळे शहरातील गोर गरीब लाभार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे घरकुल योजनेचे नगरपंचायत मधील जे शिल्लक अनुदान आहे त्यामधून लाभार्थ्यांना अंतिम (चौथा) हप्ता तात्काळ वितरित करून लाभार्थ्यांची होणारी गैरसोय थांबवावी अशी मागणी प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल अब्दुल हमीद यांनी हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर शहरात नगरपंचायत अस्तित्वात येऊन मागील नऊ वर्षाचा कार्यकाळ लोटला आहे मागील पाच वर्षांपूर्वी नगरपंचायतीचे प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल अब्दुल हमीद यांच्या कार्यकाळात हिमायतनगर शहरात बाराशे पंचवीस घरकुल मंजूर करण्यास आले होते त्यामुळे शहरातील गोरगरीब नागरिकांना पक्के घरकुल मिळाले होते त्यामुळे आता मागील दुसऱ्या टप्प्यातील अंदाजे जवळपास 300 घरकुल धारकांच्या अंतिम टप्प्याची रक्कम त्यांच्या खात्यावर अद्याप जमा झाली नाही त्यामुळे प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल अब्दुल हमीद यांनी म्हाडाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे वारंवार तोंडी व लेखी स्वरूपात घरकुलाच्या अंतिम हप्त्याची मागणी करून देखील येथील गोरगरीब नागरिकांच्या हप्त्याचे रक्कम अद्याप देण्यात आली नाही त्यामुळे त्यांनी विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्याकडे शहरातील घरकुलधारकांच्या अंतिम टप्प्याची रक्कम तात्काळ त्यांच्या खात्यात जमा करावी यासाठी एका लेखी पत्राद्वारे मागणी केली असता तात्काळ आमदार साहेबांनी येथील नगरपंचायतीचे मुख्याधिकारी ताडेवाड यांना फोन द्वारे संपर्क करून घरकुल लाभार्थ्यांच्या खात्याची राहिलेली चौथ्या हप्त्याचे रक्कम तात्काळ जमा करावे असे आदेश दिले यावेळी काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष गजानन सूर्यवंशी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जनार्धन ताडेवाड, गणेशराव शिंदे, रफिक सेठ, ज्ञानेश्वर शिंदे, बाकी भाई, योगेश चिलकावार यांच्यासह सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.