• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Tuesday, May 20, 2025
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
Tuesday, May 20, 2025
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

महिला आणि मतदान ;संघर्षातून मिळालेला मताधिकार हक्काने वापरा !

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
18 April 2024
in Top News, किनवट, नांदेड, महाराष्ट्र
32
SHARES
210
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

  नांदेड दि.१८: जगामध्ये लोकशाहीच्या व मतदानाच्या इतिहासात आपण डोकावलं तर महिलांना लोकशाहीतील सहभाग त्यांना मिळविण्यासाठी किती प्रयत्न करावे लागले होते याचा अंदाज आपणास येऊ शकतो. इसवी सन पूर्व पाचव्या शतकांत प्राचीन ग्रीस देशातील अथेन्स भागात लोकशाही शासन व्यवस्थेची सुरुवात झाली. त्यामध्ये नागरिक कोणाला म्हणायचे, शासन कोणाला म्हणायचे, शासन कसे निवडायचे इत्यादी नियम केलेले आढळतात. पण तिथे लोकशाहीतल्या ‘नागरिक’ या अत्यंत महत्वाच्या संकल्पनेत फक्त पुरुषांचा समावेश होता. शासन निर्णय प्रक्रियेमध्ये महिलांच्या मतांना मान्यता नव्हती. फक्त काही पुरुष मंडळी एकत्र यायचे, मतदान करायचे आणि शासन यंत्रणा निवडून शासन चालवायचे अशी पध्दत होती. प्राचीन बॅबिलॉन देशातील ‘हम्मुराबी कोड’ जगातील न्यायाच्या क्षेत्रातील पहिला दस्तावेज समजला जातो, पण त्यामध्ये सुद्धा स्त्रियांना दुय्यम स्थान दिलेले आढळते. निर्णयप्रक्रियेतील हक्क तर फार दूर राहिला. भारताच्या प्राचीन इतिहासात सुद्धा (वैदिक काळात) गार्गी, मैत्रेयी, लोपमुद्रा इत्यादी महिलांची नावे आपल्याला माहिती आहेत. वैदिक काळातील तत्त्वज्ञान चर्चेत त्या हिरिरीने सहभागी झाल्याची नोंद आहे, पण त्याही काळात महिलांना राजकीय व सामाजिक कार्यात निर्णयप्रक्रियेत समावेश होण्यापासून वंचित ठेवल्याचे ज्ञात आहे. ‘यत्र पुज्यंते नार्यस्तु, रमंते तत्र देवता:’ हे जरी खरे असले तरी, पुरुषांच्या बरोबरीने महिलांना राजकीय निर्णयप्रक्रियेत स्थान असल्याची उदाहरणे वैदिक काळात अभावानेच आढळतील. नंतरच्या मध्ययुगीन काळात महाराष्ट्रातील सातवाहन कालखंडांमध्ये राजांची जी नावे आहेत ती आईपासून सुरुवात होतात. जसे की इतिहासातील पहिल्या शतकातील बलाढ्य राजा ‘गौतमीपुत्र सातकर्णी’ या नावाने ओळखला जातो, तसेच त्याचा मुलगा जो नंतर मोठा राजा झाला त्याला ‘वैशिष्ठी पुत्र पौलमी’ म्हणून आपण ओळखतो. त्या काळातील शिलालेखात सुद्धा अशीच नावे असलेली दिसून येतात पण एवढं असलं तरी राजकारणात महिलांचा प्रत्यक्ष सहभाग नसल्या सारखीच परिस्थिती होती.

ADVERTISEMENT

 अर्वाचीन काळातील मानवी स्वातंत्र्याच्या इतिहासात इसवी सन १२१५ सालातील इंग्लंड मध्ये पहिल्यांदा लिहिलेल्या ‘magna carta’ चे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यातसुद्धा महिलांच्या स्वातंत्र्याच्या बाबत अनुल्लेख आहे. आजच्या काळातील अनेक देशात असलेल्या लोकशाहीचे मूळ हे magna carta पासून चालू होत असे मानले जाते, पण तिथेसुद्धा महिला पूर्वीपासून दुर्लक्षित राहिल्यात. पार्लमेंटरी लोकशाही कित्येक शतकापासून ब्रिटन मध्ये चालू आहे, पण स्त्रियांना मतदानाचा मूलभूत अधिकार मिळण्यास विसावे शतक उजडावे लागले. खूप मोठ्या चळवळीनंतर १९२८ ला इंग्लंड मध्ये स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला.

अठराव्या शतकातील अमेरिकेत झालेल्या उठावानंतर त्यांच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यात आजच्या सर्व देशातील घटनेची बीजे रोवली आहेत अश्या राजकीय व्यवस्थेला सुद्धा स्त्रीयांच्या मतदानाचे वावडे होते. त्यानंतर सुद्धा सुमारे सव्वाशे वर्षांनी स्त्रियांना तिथे मतदानाचा अधिकार मिळाला, पण तोही किमान दहा लाख स्त्रियांच्या चळवळीच्या योगदानाने!

 भारतातील आपण स्त्रिया मात्र त्या मानाने भाग्यवान आहोत, कारण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या घटनाकारांनी लागलीच पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांना मतदानाचा हक्क देऊन टाकला. देशाच्या पहिल्या लोकसभेच्या मतदानाच्या वेळी फक्त ८% महिला साक्षर होत्या, भारतीय लोकशाहीने प्रदान केलेला मतदानाचा अधिकार म्हणजे किती मोठा अधिकार होता, हे त्यावेळी त्यांच्या समजण्याच्याही पलिकडे होते.
 
मतदानाचे महत्त्व
 एवढा ऐतिहासिक संदर्भ आपल्या समोर मांडण्याची गरज कश्यामुळे आहे? तर जागतिक पातळीवर मतदानाचा हक्क स्त्रियांना मिळविण्यासाठी त्यांना किती कष्ट घ्यावे लागले, आणि त्यानंतर कित्येक वर्षांनी आपल्याला हे हक्क मिळाले हे समजावे यासाठी हा प्रयत्न आहे.
  स्त्रिया ह्या ऐतिहासिक काळापासून दुर्लक्षिल्या गेलेल्या होत्या. त्यामुळे त्यांचे प्रश्न राजकीय पटलावर येऊन त्याला सामाजिक व राजकीय उत्तरे मिळणे यालाही उशीर होत गेला. त्यामुळे मतदानाच्या हक्काचे व त्यांनी प्रत्यक्ष सहभागी होऊन मतदान करण्याला फार महत्त्व आहे. लोकशाहीच्या प्रक्रियेत अश्या प्रकारे सहभागी ही प्रत्यक्ष वेळ आहे. महिलांचे प्रश्न महिला मतदारच चांगल्या प्रकारे जाणू शकतात, त्यामुळे मतदानाचा हक्क बजावला तरच आपल्या प्रश्नाना वाचा फुटण्याचे काम चालू होणार आहे. जेवढ्या जास्त प्रमाणात महिला मतदान करतील तेवढ्या जास्त प्रमाणात लोकशाही बळकट होण्यास मदत होईल. किंबहुना महिला या समाजाच्या अविभाज्य भाग असून त्यांच्या सहभागाशिवाय लोकशाही अशक्य आहे असे आपल्या घटनाकारानी अगोदरच जाणून आपल्याला हा हक्क सुरूवातीलाच दिलेला आहे.
  आजच्या काळातील महिला कुटुंब सावरणाऱ्या आहेत, नवऱ्याच्या बरोबरीने काम करणाऱ्या आहेत, आर्थिक क्षेत्रात स्वावलंबी होत आहेत, शिक्षण व इतर बाबीत सतत पुढे जात आहेत हे आपल्या सर्वसमावेशक लोकशाही मूल्यांमुळे शक्य झालेले आहे. स्वातंत्र्याची मूल्ये अबाधित राहण्यासाठी प्रत्येक वेळी स्त्रियांनी आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. ‘हातभार तक्रारी पेक्षा बोटभर हक्क वापरा’ असे ECI ने मागे जाहिरात काढलेली होती, ती यासाठीच की मतदानामध्ये जेवढी ताकत आहे, ही कोणत्याही इतर प्रक्रियेत नाही.

त्यामुळे सर्व युवतींनी, महिला मतदारांनी पुढे येऊन या मतदानाच्या लोकशाहीच्या अनमोल अश्या पर्वात  आपला सक्रिय सहभाग नोंदवावा तरच आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेल्या हक्काचे चीज होणार आहे.मिनल करनवाल (आयएएस), मु का अ, जि प नांदेड आणि जिल्हा स्वीप प्रमुख (जिल्हा मतदान जागरूकता अभियान) #सत्यप्रभा न्युज #नांदेड

मिनल करनवाल (आयएएस), मु का अ, जि प नांदेड आणि जिल्हा स्वीप प्रमुख (जिल्हा मतदान जागरूकता अभियान)

#सत्यप्रभा न्युज #नांदेड

ADVERTISEMENT
Previous Post

श्री परमेश्वर मंदिर येथील प्रभू श्री राम लल्लाचा देखावा पाहण्यासाठी भाविक भक्तांची गर्दी

Next Post

देगलूर महाविद्यालयात नवमतदारांचे सीईओ करनवालांनी केले गुलाबपुष्प देऊन स्वागत

Related Posts

नांदेड

ग्रामपंचायतीचे नियोजन ढासळले; रखरखत्या उन्हात हंडाभर पाण्यासाठी पायपीट..सावरगावमध्ये भीषण पाणीटंचाई

16 May 2025
262
नांदेड

सावित्रीबाई फुले विद्यालयाने राखली यशस्वी परंपरा कायम…परीक्षेत घवघवीत यश…

16 May 2025
280
नांदेड

सामाजिक बांधिलकी जपत निवृत्ती वानखेडे यांनी गरीब मुलीच्या लग्नासाठी दिले आवश्यक ते कन्यादान रुपी साहित्याची भेट…

16 May 2025
263
Top News

‘स्वारातीम’ विद्यापीठातील उद्योजक परिसंवाद-२०२५ कार्यक्रमास भरघोस प्रतिसाद

16 May 2025
214
Top News

धर्माबाद ग्रामीण रुग्णालयात ‘जागतिक परिचारिका दिन’ साजरा

14 May 2025
253
DGMO
Top News

India Pakistan War | भारताने LOC वर पाकिस्तान लष्कराच्या 40 जवानांना केलं ठार

11 May 2025
211
Next Post

देगलूर महाविद्यालयात नवमतदारांचे सीईओ करनवालांनी केले गुलाबपुष्प देऊन स्वागत

विभाग प्रमुखांच्‍या गाड्यावर आता मतदान जनजागृती‘सीईओ’च्‍या हस्‍ते वाहनांवर लागले स्टिकर उमेदच्या वतीने सेल्फी पॉईंट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 1.7k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • विद्यापीठ-उद्योग भागीदारीतून मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळेल- कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांचा विश्वास नांदेड दि.१६ :विद्यापीठाकडे तरुण, ऊर्जावान मनुष्यबळ आहे. उद्योजकांच्या गरजा समजून घेऊन अभ्यासक्रमात योग्य ते बदल करत विद्यार्थ्यांना रोजगारक्षम कौशल्य देण्याची आज आवश्यकता आहे. विद्यापीठ उद्योगांशी सहकार्या सोबतच भागीदारी करू इच्छिते. विद्यापीठ-उद्योग भागीदारीतून मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी व्यक्त केला....https://www.satyaprabhanews.com/swaratim-vidyapithail-garden-campawn-2025-program/9887/
  • दत्तात्रय सज्जनधर्माबाद दि.१४ :आधुनिक नर्सिंगचा पाया रचणाऱ्या फ्लोरेन्स नाईटिंगेल यांचा १२ मे रोजी जन्मदिवस आहे. त्यांच्या स्मरणार्थ व सन्मानार्थ हा दिवस
  • India Pakistan War | भारताने LOC वर पाकिस्तान लष्कराच्या 40 जवानांना केलं ठार
.
#OperationSindoor #LOC #IndiaPakistanWar #DGMOhttps://www.satyaprabhanews.com/india-pakistan-war-india-loc-vara-pakistan-lashrachaya-40-jawanana/9876/
  • शासनाच्यावतीने सर्वतोपरी मदतीची ग्वाही नांदेड दि.११ : देगलूर तालुक्यातील तमलूर गावाचे सुपुत्र, भारतीय लष्करातील शहीद जवान सचिन यादवराव वनंजे यांच्या कुटुंबीयांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज देगलूर येथील त्यांच्या राहत्या घरी सांत्वनपर भेट घेतली. शहीद सचिन यांच्या कुटुंबीयांना शासनाच्यावतीने सर्वोतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली. आमदार प्रतापराव चिखलीकर, आमदार विक्रम काळे, आमदार जितेश अंतापूरकर, उपविभागीय अधिकारी अनुप पाटील, तहसीलदार भरत सूर्यवंशी, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीलिमा कांबळे आदिंची यावेळी उपस्थिती होती....https://www.satyaprabhanews.com/shaheed-sachin-vananje-yanchaya-kutumbianchi-deputy-chief-minister-ajit-pawar-yani-ghatli-consolation/9871/
  • राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली शहीद जवान सचिन वनजे यांच्या कुटुंबीयांची भेट.राज्य शासनाकडून सर्वोत्तपरी मदत देण्याचे दिले आश्वासन.नांदेड :- राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. नांदेडच्या मुखेड तालुक्यातील चव्हाणवाडी येथे पक्षप्रवेश सोहळा झाल्यानंतर अजित पवार यांनी देगलूर येथे शहीद जवान सचिन वनजे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. सचिन वनजे हे जम्मू काश्मीर मध्ये दरीत लष्कराच वाहन कोसळून शहीद झाले.शहीद जवान सचिन वनजे यांच्या पत्नी आणि आई-वडिल यांची भेट घेऊन सांत्वन केले.राज्य शासनाकडून सर्वोत्तपरी मदत देण्याचे आश्वासन यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.सत्यप्रभा न्युज नेटवर्क नांदेडबाईट:-अजित पवार (उपमुख्यमंत्री )
  • हदगाव हिमायतनगर विधानसभेत आमदार कोहळीकर यांच्या प्रयत्नातून हिमायतनगरात पाचवे मोफत सर्व रोग निदान शिबिर संपन्न मोफत सर्व रोग निदान व उपचार शिबिरे ही काळाची गरज. हजारो रुग्णांनी घेतला या शिबिराचा लाभ. हिमायतनगर दि.११: शिवसेना पक्षप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणी प्रमाणे ८०टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करण्याची लहानपणापासूनच आवड असल्याने हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात मागील एक वर्षापासून अविरतपणे मतदारसंघातील गोरगरीब रुग्णांच्या मदतीसाठी दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था संचलित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी यांच्या संयुक्त विद्यमाने हदगाव हिमायतनगर विधानसभेचे लोकप्रिय आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्यामार्फत सर्व रोग निदान व उपचार शिबिरे घेण्यात येत आहेत आज दिनांक ११ मे रोजी हिमायतनगर येथील श्री परमेश्वर देवस्थान येथे पाचवे मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी केले यावेळी बोलताना त्यांनी असे सांगितले की अशी आरोग्य शिबिरे घेणे ही काळाची गरज आहे या शिबिराच्या माध्यमातून हजारो गरजू रुग्णांना लाभ मिळतो यातच मोठे समाधान आहे असे त्यांनी बोलताना सांगितले.....https://www.satyaprabhanews.com/thousand-garju-ruganana-or-shibiracha-benefits-motach-motha-samadhan-maminar-kohil/9868/
  • नांदेड दि.११: नांदेड शहर व परिसरात गुन्हेगारांनी पुन्हा डोके वर काढले यातून तीन जणांमध्ये वाद होऊन एकाने दुसºयावर गोळीबार केला. यात एक जण ठार झाला तर अन्य एक गंभीर जखमी झाला. वसरणी येथील जलशुद्धीकरण केंद्राजवळ रविवारी सकाळी ११ वा. ही घटना घडली. त्यामुळे ‘ब्रेक के बाद’ नांदेडमध्ये गोळीबाराचा अनुभव नांदेडकरांना आला.दोन महिन्यापूर्वीच शहरातील गुरुद्वारा परिसरात घडलेल्या गोळीबाराची चर्चा थंडावत असताना आज दि.११ मे रोजी सकाळी पुन्हा एकदा गोळीबाराने नांदेड शहर हादरले....https://www.satyaprabhanews.com/after-the-break-nandedamadhyay-golibarik/9865/
  • आईच्या प्रेमाला माप नाही… तिच्या मायेच्या सावलीला सलाम!मातृदिनाच्या च्या हार्दिक शुभेच्छा..!❤️
  • When the beat drops, we don’t stop...C’mon, let’s dance..!!#sikkim #banjara #traveller #roadtrip #bike
#16thmay“बंजारा”Releasing on 16th May 2025#morayaproduction #InCinemasOn16May2025 #CmonLetsDanceSongOutNow
  • Trending
  • Comments
  • Latest
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Breaking News : 'लोकशाही मराठी' चॅनल 30 दिवसांसाठी बंद, माहिती-प्रसारण मंत्रालयाने परवाना केला निलंबित

Breaking News : ‘लोकशाही मराठी’ चॅनल 30 दिवसांसाठी बंद, माहिती-प्रसारण मंत्रालयाने परवाना केला निलंबित

ग्रामपंचायतीचे नियोजन ढासळले; रखरखत्या उन्हात हंडाभर पाण्यासाठी पायपीट..सावरगावमध्ये भीषण पाणीटंचाई

16 May 2025

सावित्रीबाई फुले विद्यालयाने राखली यशस्वी परंपरा कायम…परीक्षेत घवघवीत यश…

16 May 2025

सामाजिक बांधिलकी जपत निवृत्ती वानखेडे यांनी गरीब मुलीच्या लग्नासाठी दिले आवश्यक ते कन्यादान रुपी साहित्याची भेट…

16 May 2025

‘स्वारातीम’ विद्यापीठातील उद्योजक परिसंवाद-२०२५ कार्यक्रमास भरघोस प्रतिसाद

16 May 2025

Recent News

ग्रामपंचायतीचे नियोजन ढासळले; रखरखत्या उन्हात हंडाभर पाण्यासाठी पायपीट..सावरगावमध्ये भीषण पाणीटंचाई

16 May 2025
262

सावित्रीबाई फुले विद्यालयाने राखली यशस्वी परंपरा कायम…परीक्षेत घवघवीत यश…

16 May 2025
280

सामाजिक बांधिलकी जपत निवृत्ती वानखेडे यांनी गरीब मुलीच्या लग्नासाठी दिले आवश्यक ते कन्यादान रुपी साहित्याची भेट…

16 May 2025
263

‘स्वारातीम’ विद्यापीठातील उद्योजक परिसंवाद-२०२५ कार्यक्रमास भरघोस प्रतिसाद

16 May 2025
214
ADVERTISEMENT

Satyapabha News…

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

ग्रामपंचायतीचे नियोजन ढासळले; रखरखत्या उन्हात हंडाभर पाण्यासाठी पायपीट..सावरगावमध्ये भीषण पाणीटंचाई

16 May 2025

सावित्रीबाई फुले विद्यालयाने राखली यशस्वी परंपरा कायम…परीक्षेत घवघवीत यश…

16 May 2025
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2023 Satyaprabha News - Satyaprabha News Media Managments SatyaprabhaNews.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2023 Satyaprabha News - Satyaprabha News Media Managments SatyaprabhaNews.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज