हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/-मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलना दरम्यात अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहेत नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरातील सकल मराठा समाजाच्या आंदोलकांवर रास्ता रोको आंदोलन केल्या प्रकरणी हिमायतनगर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या बाबत सविस्तर वृत्त असे की दि 1 नोव्हेंबर रोजी किंनवट ते भोकर या राष्ट्रीय महामार्गावर हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर मंदिर कमान समोर सकल मराठा समाजाच्या बांधवांनी गैर कायद्याची मंडळी जमवून रोड च्या दोन्ही कडेला वाहने अडून रोडवर टायर,लाकडी खोड जाळून माननिय जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून हिमायतनगर बाजार पेठ जबरदस्तीने बंद करावी असे आवाहन करून आंदोलन केल्या प्रकरणी दिलेल्या फिर्यादी वरून गुन्हा दखल करण्यात आला आहे यावेळी राष्ट्रीय महामार्ग आंदोलकांनी रोखून धरला होता. परंतु नांदेड जिल्ह्यातील महामार्ग आणि इतर मुख्य मार्गावर कुठलेही आंदोलन रास्ता रोको करण्यास जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी कलम १४४ लागू करून प्रतिबंध केला आहे. याच दरम्यान आंदोलन करण्यात आल्याने जमावबंदीचे आदेश लागू असताना देखील शहरातील मराठा आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. आंदोलन करत जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन आंदोलकांनी केले. यामुळे रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या शहरातील २३ मराठा आंदोलकांवर हिमायतनगर पोलीस ठाण्यात गु.र.न.225/23 कलम 341,143,149 भादवी सह कलम 135 मुंबई पोलीस कायदा प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक बि.डी.भुसनूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आजिनाथ पाटील हे करीत आहेत