तालुकाध्यक्षपदी संजय कदम तर उपाध्यक्षपदी दत्तात्रय सज्जन यांची फेरनिवड
धर्माबाद ता. प्र.दत्तात्रय सज्जन दि.७ :-व्हॉईस ऑफ मीडियाची नूतन कार्यकारिणी शनिवारी शासकीय विश्रामगृह येथे पार पडलेल्या बैठकीत गठित करण्यात आली असून व्हॉईस ऑफ मिडियाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष विजय चोरडिया आणि नांदेड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष गणेश जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत सदरील बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी दै.देशोन्नतीचे प्रतिनिधी तथा ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांची धर्माबाद तालुकाध्यक्षपदी सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली असून उपाध्यक्ष पदी दत्तात्रय सज्जन यांची निवड करण्यात आली आहे. तर यासोबतच सचिवपदी राजेश सोनकांबळे, सहसचिव संजय झगडे, कोषाध्यक्ष गंगाप्रसाद सोनकांबळे, तर संघटकपदी नारायण इबितवार यांची निवड करण्यात आली आहे. तर सदस्य म्हणून सुरेश घाळे व जकिउद्दिन सर यांची निवड करण्यात आली आहे. तसेच यावेळी जिल्हास्तरावरून आलेल्या मान्यवरांनी संघटनेच्या धोरणात्मक वाटचालीबाबत अवगत केले,संघटनेच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवर पत्रकारांच्या न्याहक्कासाठी चालू असलेली कार्यपद्धती स्पष्ट केली, आणि नूतन कार्यकारिणीस शुभेच्छा प्रदान करून पुढील वाटचालीबाबत मार्गदर्शन केले. तसेच तालुक्यातील भूमिपुत्र तथा दै.प्राप्ती टाईम्स चे संपादक यांची प्रेस संपादक व पत्रकार सेवसंघाच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तद्वतच संघटनेचे पदाधिकारी गंगाधर आलुरोड यांचे काही दिवसांपूर्वी दुःखद निधन झाले होते, त्यांच्या स्मृतीस उपस्थितांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी इंद्रधनुष टाइम्स चे मुख्यसंपादक डॉ. सुधीर येलमे जेष्ठ पत्रकार संजय कदम, पी.जी. कोटुरवार, संजय झगडे, गंगाप्रसाद सोनकांबळे, दत्तात्रय सज्जन, नारायण इबितवार, तालुका अध्यक्ष पत्रकार संरक्षण समिती चे म. मुबशीर, कृष्णा जाजेवार, राजेश सोनकांबळे, पांडुरंग जाजूलवाड तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते. उपरोक्त निवडीचे अनेकांनी स्वागत केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा प्रदान केल्या आहेत.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड












