

हिमायतनगर प्रतिनिधी/- नांदेड – कामारी बस पिंपरी- विरसनी- टेंभूर्णी दिघी- घारापुर मार्गे हिमायतनगर मुक्कामी पाठविण्यात यावी अशी मागणी ग्रामपंचायत टेंभूर्णी पावनमारीचे सरपंच प्रल्हाद पाटील टेंभुर्णीकर यांनी आगार प्रमुख हदगाव महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्याकडे एक लेखी निवेदन देऊन केली आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्र परिवहन विभाग नियंत्रक महामंडळ नांदेड यांना दिनांक 14 मार्च 2024 रोजी दिलेल्या पत्रानुसार उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग हिमायतनगर यांच्या कार्यालया कडून हा रस्ता वाहतुकीसाठी योग्य असल्याचा अहवाल देऊन सुद्धा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आगार कार्यालय हदगाव यांच्याकडे वेळोवेळी नांदेड- कामारी बस पिंपरी-विर सनी- टेंभुर्णी – दिघी-घारापुरी या मार्गे हिमायतनगर मुक्कामी सोडण्यात यावी अशी मागणी मागील एक वर्षापासून आगार प्रमुखाकडे टेंभुर्णी येथील ग्रामस्थांची सुरू आहे टेंभुर्णी येथील शाळकरी विद्यार्थ्यांन सह ज्येष्ठ नागरिक व महिलांना गावाकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने अनेक अडचणी येत होत्या पण आता ये जा करण्यासाठी पक्का रस्ता झाला, मात्र बसगाडी नाही त्यामुळे येथील शाळकरी विद्यार्थ्यांसह महिलांना जेष्ठ नागरिकांना मोठी अडचण होत आहे त्यामुळे ग्रामपंचायत टेंभुर्णी येथील ग्रामस्थांकडून आगार प्रमुख महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ हदगाव यांच्याकडे एका लेखी निवेदनानुसार नांदेड कामारी बस पिपरी- विरसणी- टेंभुर्णी मार्गे हिमायतनगर येथे मुक्कामी सोडण्याची मागणी सरपंच प्रल्हाद पाटील टेंभुर्णीकर यांनी केली आहे…..