ता. प्र.दत्तात्रय सज्जन
धर्माबाद दि.१८: तालुक्यातील बेलुर बु.येथील रहिवाशी महीला लिंगाबाई शंकर रामडगे यांना एक मुलगा,एक मुलगी हे लहान आहेत. काल दुपारी १२ वाजताच्या सुमारास शॉर्टसर्कीटने आग लागून जीवनावश्यक सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. यामध्ये घरातील सामान कपडे राशन भांडे बर्तन सर्वच जळून खाक झाले आहे. सदरील शॉर्टसरकीने आग ही दुपारच्या वेळी लागल्याचे माजी सरपंच आलुर नेरळीचे तथा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते पत्रकार संघटनेचे अध्यक्ष बाबुराव पाटील आलूरकर यांनी प्रस्तुत प्रतिनिधींना सांगितले की. उपरोक्त पार्श्वभूमीवर शॉर्टसर्किटने आग लागण्याच्या घटना वाढत असून यामध्ये उंदरांचा प्रादुर्भाव, त्यामुळे
त्यांच्याद्वारे होत असल्याची वायर कटिंग या गोष्टी प्रामुख्याने जबाबदार असल्या तरी सदरील वायर फिटिंग निकष पूर्ण आहे का हा विषय ही महत्त्वाचा आहे. तरी जीवनावश्यक वस्तू सर्व जळून खाक झाल्यामुळे निराधार महीला लिगाबाई शंकर रामडगे यांना प्रशासनाने मदत करण्यात यावी अशी ही विनंती सोशल मीडियाद्वारे करण्यात येत आहे..
#सत्यप्रभा न्युज #नांदेड