• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Monday, May 18, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

अनुसूचित जाती उपवर्गीकरण म्हणजे सत्ताधारी व प्रस्थापित व्यवस्थेचे सुनियोजित षडयंत्र..

Tushar Kamble by Tushar Kamble
22 April 2026
in Top News, नांदेड, विशेष लेख, हदगाव
IMG 20260422 WA0308
56
SHARES
370
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

“अनुसूचित जाती उपवर्गीकरण” ही मागणी म्हणजे माझ्या मते “एक- दोन शीतं मिळवण्यासाठी संपूर्ण भाताचं पातेलं करपवून टाकणे ” किंवा “एक आंबा हाताला येत नाही म्हणून भाड्याने JCB बोलवून आंब्याचे झाडच खाली पाडुन JCB मालकाच्या हाताने उपकार म्हणून एक दोन आंबे मिळवणे”. यापलीकडे काही नाही.

माझ्या मातंग बांधवांनो फक्त आरक्षणाने सर्व समस्या सुटत नसतात जर सुटायच्या असत्या तर आजपर्यंत आरक्षित समूहांच्या सर्व समस्या सुटल्या असत्या.ते एक साधन जरुर आहे पण साध्य नाही. त्यामुळे वर्गीकरण झाले म्हणजे आपल्याला जणू स्वातंत्र्य मिळणार आहे असं भासवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. परंतु सत्य हे आहे कि यातुन फायदा तर होणारच नाही परंतु बहुजन महापुरुषांच्या व आंबेडकरी सामाजिक चळवळीच्या कित्येक वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर निर्माण झालेल्या संघटन शक्तीला तडा जाणार आहे.
त्याचे कारण असे कि, सरकारी क्षेत्रच आता खाजगी होऊन बसलय जिथे आरक्षण लागू नाही. आणि आपण मोजक्या सरकारी नोकरीसाठी एका ताटात खालेल्या आपल्याच बांधवाशी वैर निर्माण करण्यास सत्तधार्यांना व मनुवाद्यांना वाव देत आहोत ज्यांना आमचं साधं माणुसपण मान्य नाही. आपल्यात काही अंतर्गत रुसवे फुगवे आपण आपल्या पातळीवर सोडवू शकतो. अनुसूचित जातीत जे समूह शैक्षणिक व सामाजिक पातळीवर मागे राहिले त्यांना पुढे आणण्यासाठी कृती आराखडा तयार करून आपण याही समस्यांचे निराकरण सामाजिक चळवळीच्या माध्यमातून करू शकतो. बाबासाहेबांना मानणारा कुठल्याही जातीचा व्यक्ती काळाच्या मागे पडलेल्या कोणालाही पुढे आणण्यासाठी क्षणाचाही विचार न करता जी शक्य असेल ती मदत करायला तयार असतो. जात बघून आंबेडकरी चळवळ मदतीला धावत नाही तर शोषित, पिडीत, वंचित समूह कोणाकडूनही छळल्या जात असेल तर छातीचा कोट करून लढायला समोर येते. खैरलांजी प्रकरणापासुन सद्याच्या लातूरच्या अनुष्का पाटोळे प्रकरणापर्यंत आंबेडकरी चळवळ मातंग समाजावरील अन्याय अत्याचाराच्या विरोधात आपल्यासोबत उभी आहे. अशा जीवाभावाचे सबंध असलेल्या आपल्या बांधवांशी आपले सबंध बिघडावे यासाठी मनुवादी हा खेळ खेळत आहेत एवढे आपल्याला समजायला नको का? आरक्षणाचे उपवर्गीकरण झाले तरी बौद्ध समाजाला त्याचा काही फटका बसणार नाही कारण आरक्षणाव्यतिरीक्त बरेच प्रगतीचे मार्ग त्यांनी निर्माण केले आहेत परंतु मातंग, चर्मकार व इतर छोट्या जातीसमुहांचे मोठे नुकसान होईल त्यामुळे पोटतिडकीने ते समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत.

आरक्षणाच्या भरवशावर सर्वांनाच सरकारी नोकरी शक्य नाही. त्या व्यतिरिक्त सुद्धा ज्या संधी खाजगीकरण, जागतिकीकरण व उदारीकरणाने निर्माण केल्या त्या आम्ही मिळवल्या पाहिजे.
1) भारतीय व बहुराष्ट्रीय खाजगी कंपन्यांना सुद्धा कुशल व मेहनती कर्मचार्यांची गरज आहे. आपल्या शिक्षण व अनुभवानुसार तिथेही चांगला पगार,सामाजिक सुरक्षा व आरोग्य सेवा सुविधा कायद्याने बंधनकारक आहेत.
2) लघु उद्योगासाठी सरकार विविध योजना राबवते त्या आपण मिळवू शकतो.
3) विविध एनजीओ मध्ये सुद्धा ज्यांना सामाजिक कार्यात आवड आहे अशांना चांगल्या संधी आहेत.

यासह अजून बरेच मार्ग आहेत परंतु या सर्वांसाठी प्रथम शिक्षण घ्यावं लागतं. आपण समजू शकतो की अकरावी बारावी व पदवी-पदव्युत्तर ला आरक्षणानुसार मेरीट लिस्ट लागते. त्यानंतर प्रवेश होतो. त्यामुळे कदाचित आरक्षण वर्गीकरणाचे समर्थक म्हणु शकतात आमच्यापेक्षा प्रबळ असलेल्या समुहाने आमच्या जागा खाल्या म्हणून आमच्या मुलांना प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे आमचे साक्षरतेचे प्रमाण कमी आहे. परंतु राज्यात प्राथमिक शिक्षण सर्वांसाठी मोफत व सक्तीचे आहे तरी मातंग समाजातील साक्षरतेचे प्रमाण समाधानकारक आहे का? ते कोणत्याही आरक्षण वर्गीकरणाचे समर्थन करणार्या पुढार्याने सांगावे. याचे उत्तर नकारार्थीच असेल. त्यामुळे योग्य निदान करुन मगच योग्य उपचार करणे हा साधा नियम आम्ही समजून घेतला पाहिजे. मग तो आजार शारीरिक असो कि सामाजिक. अन्यथा आजार बळावत जावून ज्याप्रमाणे माणूस दगावू शकतो तसा समाज सुद्धा सामाजिक विकलांग होऊन या प्रगतीच्या स्पर्धेतून नामशेष होऊ शकतो. मग माणुस दगावल्यावर डॉक्टर ला दोष देऊन आणि समाज सामाजिक विकलांग होऊन प्रगतीच्या स्पर्धेतून नामशेष झाल्यावर नेत्यांना दोष देऊन काहीच साध्य होत नाही. तेव्हा हाती लागते ती केवळ निराशा. ती निराशा नको असेल तर आमच्या आशा पल्लवित करणारे संत रविदास,महात्मा फुले, क्रांतीगुरु लहुजी साळवे, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे समाज जोडणारे व समाजाला योग्य दिशा देणारे विचार आत्मसात करून अखंड अनुसूचित जाती प्रवर्गातील सर्व जातींचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करुयात. एकजुट होऊन या व्यवस्थेशी लढुयात. मनुवादी शक्तींचे विभाजनाचे मनसुबे धुळीत मिळवूया. बौद्ध-मातंग-चर्मकार-ढोर-भंगी व तमाम इतर समाजबांधव अनुसूचित जाती म्हणून एक राहुयात.

“थवा सोडू नका पाखरांनो
शिकारी गालात हसला आहे,
तुमची एकी बघूनच तर तो
आजवर शांत बसला आहे”

जय भीम… जय लहुजी… जय रविदास.. जय संविधान

— मंगेश गाडगे✍️

Tags: विशेष लेख
Previous Post

रयत सेवाभावी प्रतिष्ठान जवळगाव च्या वतीने गरीब कुटुंबांना कन्यादान मदत …

Next Post

आरक्षण वर्गीकरणासाठी सोमवारी आझाद मैदानावर ‘महा वज्रमूठ’ आंदोलन…

Next Post
IMG 20260422 WA0204

आरक्षण वर्गीकरणासाठी सोमवारी आझाद मैदानावर 'महा वज्रमूठ' आंदोलन...

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करत होतो. एखाद्या डोंगरखेड्यात जाऊन काही करता येईल का? तिथेच आपले चार खांदे शोधावेत आणि त्यांच्यासाठी काही करता येईल का असा विचार मनात आला होता.
.
#NanaPatekar #SatyaprabhaNews #BreakingNews #MarathiNews #bollywoodactor
  • महादेव मठ संस्थान हदगाव तर्फे होणाऱ्या पट्टाभिषेक वर्धापन दिन सर्वधर्मीय सोहळ्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे – श्री ष. ब्र .108 सद्गुरु शिवचैतन्य शिवाचार्य गुरुमाऊली…तुषार कांबळे! हदगाव प्रतिनिधी! दिनांक 19 ,20 व 21 मे 2026 रोजी कस्तुरी मंगल कार्यालयासमोर नांदेड रोड येथे भव्य दिव्य असा सर्व धर्मीय चतुर्थ पट्टाभीषेक सोहळा वर्धापन दिन साजरा करण्यात येत असून त्याची अतिशय भव्य अशी तयारी पूर्ण झाली. पंचक्रोशीतील सर्व गावकऱ्यांनी सढळ हाताने या कार्यक्रमास योगदान दिले असून त्यामुळे हा सोहळा अधिकच व्यापक आणि मोठ्या स्वरूपात संपन्न होत आहे. सकाळी शिवयोगी श्री बसवलिंग स्वामी संजीवन समाधी रुद्राभिषेक करून सुरुवात होणार असून रुद्र स्वाहाकार पंचकुंडी यज्ञ तसेच भव्य पारायण संकीर्तन व धर्म सभा, नगर भोजनाने हा सोहळा संपन्न होणार असून यासाठी उज्जैन जगद्गुरु श्री...http://www.satyaprabhanews.com/on-the-day-of-pattabhishek-vardhapan-organized-by-mahadev-math-sansthan-hadgaon/12418/?utm_source=instagram-business&utm_medium=jetpack_social
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या परदेश दौऱ्यात देशाच्या भविष्यासाठी समुद्रातून पाईपलाईनद्वारे थेट पेट्रोल-डिझेल आणता येईल का, याचे प्लॅनिंग करत आहेत. मात्र, काँग्रेस आणि महाआघाडीतील नेते त्यांच्यावर आरोप करत आहेत. - गोपीचंद पडळकर, भाजप, आमदार
.
#GopichandPadalkar #NarendraModi #SatyaprabhaNews #BJP #LatestNews
  • नीट पेपर फुटी प्रकरण: प्रा.शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात.पुण्याहून दिल्लीला हलवल्याची माहिती.
  • “डिझेल दरवाढीचा फटका; एसटी तिकीटदर वाढीचे संकेत, प्रताप सरनाईकांचे मोठे वक्तव्य”प्रताप सरनाईक यांनी वाढत्या डिझेल दरांमुळे एसटी महामंडळावर मोठा आर्थिक ताण पडत असल्याचे सांगत तिकीटदर वाढीचे संकेत दिले आहेत. एसटीला दररोज सुमारे १० लाख ८७ हजार लिटर डिझेल लागते आणि दरवाढीमुळे दररोज ३३ लाख रुपयांहून अधिक अतिरिक्त भार सहन करावा लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.सरकारकडून विशेष मदत न मिळाल्यास पुढील १० ते १२ दिवसांत तिकीटदर वाढीबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले. मात्र विद्यार्थ्यांसह विविध प्रवासी सवलती कायम राहतील, अशी ग्वाही देण्यात आली आहे.दरम्यान, अनधिकृत बाईक टॅक्सी सेवांवर कारवाई होणार असल्याचेही सरनाईक यांनी स्पष्ट केले.#PratapSarnaik #STBus #DieselPriceHike #MaharashtraNews #SatyaprabhaNews
  • राज्य शासन आणि केंद्रसरकारने जर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सिरीयसली घेतले नाही तर नाशिकमधून दिल्लीला जाणारा रस्ता आम्ही बंद करणार म्हणजे करणार.
.
#RohitPawar #SatyaprabhaNews #farmer #BreakingNews #OnionRate
  • NEET 2024 ला पेपर लीक झाला. परीक्षा रद्द झाली नाही. मंत्र्यांनी राजीनामा दिला नाही. CBI चौकशी सुरू केली. एक समिती स्थापन करण्यात आली. त्यानंतर 2026 ला पेपर लीक झाला. परीक्षा रद्द झाली. मंत्र्यांनी पुन्हा राजीनामा दिला नाही. सीबीआय पुन्हा चौकशी करत आहे. आता आणखी एक समिती स्थापन केली जाईल.: राहुल गांधी
.
#SatyaprabhaNews  #RahulGandhi #NEET
  • Political News : मोठा राजकीय भूकंप? पंतप्रधान राजीनामा देण्याच्या तयारीत; ब्रिटनमध्ये राजकीय घडामोडींना वेग
.
#britainpm #KeirStarmer #SatyaprabhaNewshttp://www.satyaprabhanews.com/political-news-major-state-earthquake-prime-minister-ready-to-resign-state-earthquake-in-britain/12410/?utm_source=instagram-business&utm_medium=jetpack_social
  • ओला, उबर, रॅपिडो बाईक टॅक्सी
ॲपवरील कारवाई स्थगित!
.
#SatyaprabhaNews #Bike #RapidoCaptain #biketaxi
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10438
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8168
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6600
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

6268
IMG 20260518 WA0224

महादेव मठ संस्थान हदगाव तर्फे होणाऱ्या पट्टाभिषेक वर्धापन दिन सर्वधर्मीय सोहळ्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे – श्री ष. ब्र .108 सद्गुरु शिवचैतन्य शिवाचार्य गुरुमाऊली…

18 May 2026
britain pm Keir starmer

Political News : मोठा राजकीय भूकंप? पंतप्रधान राजीनामा देण्याच्या तयारीत; ब्रिटनमध्ये राजकीय घडामोडींना वेग

18 May 2026
Rupali Chakankar

रुपाली चाकणकरांची 6 तास ईडी चौकशी, बाहेर येताच माध्यमांशी बोलल्या; गुवाटही दौऱ्याबाबतही सांगितलं

14 May 2026
IMG 20260512 210505

पांदण व वहिवाट रस्त्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावा; आमदारांचे प्रशासनाला निर्देश.

12 May 2026

Recent News

IMG 20260518 WA0224

महादेव मठ संस्थान हदगाव तर्फे होणाऱ्या पट्टाभिषेक वर्धापन दिन सर्वधर्मीय सोहळ्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे – श्री ष. ब्र .108 सद्गुरु शिवचैतन्य शिवाचार्य गुरुमाऊली…

18 May 2026
britain pm Keir starmer

Political News : मोठा राजकीय भूकंप? पंतप्रधान राजीनामा देण्याच्या तयारीत; ब्रिटनमध्ये राजकीय घडामोडींना वेग

18 May 2026
Rupali Chakankar

रुपाली चाकणकरांची 6 तास ईडी चौकशी, बाहेर येताच माध्यमांशी बोलल्या; गुवाटही दौऱ्याबाबतही सांगितलं

14 May 2026
IMG 20260512 210505

पांदण व वहिवाट रस्त्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावा; आमदारांचे प्रशासनाला निर्देश.

12 May 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

IMG 20260518 WA0224

महादेव मठ संस्थान हदगाव तर्फे होणाऱ्या पट्टाभिषेक वर्धापन दिन सर्वधर्मीय सोहळ्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे – श्री ष. ब्र .108 सद्गुरु शिवचैतन्य शिवाचार्य गुरुमाऊली…

18 May 2026
britain pm Keir starmer

Political News : मोठा राजकीय भूकंप? पंतप्रधान राजीनामा देण्याच्या तयारीत; ब्रिटनमध्ये राजकीय घडामोडींना वेग

18 May 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज