नांदेड दि.२४ : नांदेड जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमदार व खासदार यांच्या स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गतच्या निधीत दरवर्षी दिव्यांगासाठी ३० लक्ष रूपये निधी खर्च करण्यात यावे अशी तरतूद करण्यात आली आहे, मात्र नेहमीच ही रक्कम खर्च करण्यासाठी आमदार व खासदार हे आपली उदासीनता दाखवत आहेत, जेंव्हा केंव्हा दिव्यांगाच्या प्रश्नावर दिव्यांग संघटना आवाज उठवतात तेंव्हाच मात्र शासनाला ही रक्कम खर्च करा म्हणायची वेळ आमदार व खासदारावर का येत आहे.? त्या अनुषंगाने पत्र व्यवहार देखील केला असल्याचा ठपका ठेवला जातो ही बाब अतिशय दुर्दैवी असल्याचे बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी प्रसार माध्यमांसमोर बोलताना आज म्हटले आहे .
दिव्यांग हा समाजातील दुर्बल घटक असून त्यांना स्वाभिमानाने जगता यावे यासाठी शासनाच्या वतीने विशेष निधीची तरतूद केली आहे, मात्र त्याकडे आमदार खासदार हे जाणीवपूर्ण दुर्लक्ष करत असून त्यांना दिव्यांगा सोबत फोटो काढून त्यांची प्रसिद्धी कशी करता येईल याकडे त्यांचे लक्ष असते मात्र दिव्यांगांसाठी राखीव असलेला निधी खर्च करण्यात राज्यातील राजकारणी हे सपशेल अपयशी ठरत असल्याची टिका देखील राहुल साळवे यांनी करत सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरी स्वराज्य संस्था मध्ये देखील दिव्यांगांच्या शासन निर्णयीत राखीव ५ टक्के निधी खर्चासाठी सुद्धा अशीच उदासीनता असल्याचे म्हणत संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील रक्कम सुद्धा चार-चार महिने दिव्यांग निराधारांना दिले जात नसल्याचे राहुल साळवे यांनी आज म्हटले आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड