
हिमायतनगर प्रतिनिधी/- भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष गजानन चायल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हिमायतनगर येथील भाजपा कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक कन्या शाळेत जाऊन तेथील चिमुकल्या विद्यार्थ्यांना वही पेन वाटप करून शहरातील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप केली व शहरात सुरू असलेल्या श्री परमेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटीच्या यात्रा महोत्सवातील साईराम टुरिंग टॉकीज मध्ये सामाजिक कार्यकर्ते उदय देशपांडे यांच्याकडून छावा चित्रपटाचे दोन शो यात्रेमध्ये येणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांना व प्रेक्षकांना मोफत दाखविण्यात आले त्यामुळे सामाजिक राजकीय क्षेत्रातील असंख्य मान्यवरांनी त्यांचा ठीक ठिकाणी वाढदिवस साजरा करून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला…

या बाबत सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर शहरातील असंख्य नवतरुण युवकांच्या गळ्यातील ताईत व संघाच्या तालमीत वाढलेले माजी बजरंग दल तालुका अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीचे विद्यमान तालुका अध्यक्ष गजानन चायल यांना लहानपणापासूनच संघटन मजबूत करणे व देव देश धर्मासाठी काम करण्याची आवड आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी च्या पक्ष संघटन वाढीसाठी तालुक्यात झपाट्याने काम करून या मतदारसंघात कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण केली या मतदारसंघात ते लहाना पासून थोरापर्यंत नावलौकिक आहेत त्यामुळे दिनांक 12 मार्च रोजी त्यांच्या वाढदिवसाचे अवचित्य साधून हिमायतनगर येथील भारतीय जनता पार्टीच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक कन्या शाळेतील विद्यार्थ्यांना वही पेन वाटप करून ग्रामीण रुग्णालय येथील रुग्णांना फळे वाटप करत त्यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपून साजरा केला व छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकणारा चित्रपट श्री परमेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटीच्या यात्रेतील साईराम टुरिंग टॉकीज मध्ये सुरू असताना शहरातील सामाजिक कार्यकर्ते उदय देशपांडे यांनी या पिक्चरचे दोन शो त्यांच्या वाढदिवसानिमित्त शाळकरी विद्यार्थ्यांना व प्रेक्षकांना मोफत दाखवून एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने सामाजिक संदेश देऊन छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवन चरित्राचा इतिहास त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रेक्षकांना दाखवून दिला त्यामुळे असंख्य सामाजिक राजकीय व शैक्षणिक स्तरातील मान्यवरांकडून त्यांचा वाढदिवस ठिकठिकाणी साजरा करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी हिमायतनगर भाजपा शहर अध्यक्ष विपुल दंडेवाड,सोशल मीडिया जिल्हा संयोजक नागेश शिंदे,लक्ष्मण डांगे, कल्याणसिंग ठाकूर, दुर्गेश मंडोजवार,राहुल नरवाडे,शितू सेवणकर, परमेश्वर नागेवाड ,ओमकार चरलेवर ,मंगेश धुमाळे ,ज्ञानेश्वर कोरडे सह असंख्य भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते