
हिमायतनगर प्रतिनिधी /- नगरपंचायतीमध्ये मागील अनेक दिवसांपासून प्रभारी मुख्याधिकारी म्हणून कारभार सुरू आहे हिमायतनगर नगरपंचायतला कायमचा मुख्य अधिकारी देण्याची मागणी अनेक वेळेस गावकऱ्यांनी केली पण प्रशासकीय राजवट असल्यामुळे कर्मचाऱ्यांची कमतरता लक्षात घेऊन हिमायतनगरच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार पल्लवी टेमकर यांनाच येथील मुख्याधिकारी पदाचा पदभार उपविभागीय अधिकारी हदगाव यांनी दिला आहे त्यामुळे हिमायतनगर नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष मोहम्मद जावेद हाजी अब्दुल गणी व त्यांच्या शिष्टमंडळांनी नगरपंचायतीचा पदभार स्वीकारताच मुख्याधिकारी पल्लवी टेमकर यांचे स्वागत करून शहरातील विविध समस्या वर त्यांच्याशी चर्चा केली….
या बाबत सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर नगरपंचायत अस्तित्वात येऊन दहा वर्ष होत आहेत तरीपण या नगरपंचायतीचा कारभार पारदर्शक झाला नाही हिमायतनगर शहरातील नागरिकांना नमुना नंबर 43, स्वच्छता व घाणीचे साम्राज्या सह पाणीपुरवठ्याचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून भेडसावत आहे या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी आगामी काळात काम करावे व शहरा सह नगरपंचायतीचा कारभार पारदर्शक करून गावातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावे अशी विनंती हिमायतनगर नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष मोहम्मद जावेद हाजी अब्दुल गणी यांनी नूतन मुख्याधिकारी पल्लवी टेमकर यांना केली आहे हिमायतनगर नगरपंचायतीचा कारभार मागील अनेक दिवसांपासून प्रभारी मुख्याधिकारी म्हणून तहसीलचे नायब तहसीलदार ताडेवाड हे पाहत होते त्यांची अचानक तडकाफडकी उचल बांगडी करून त्यांच्या जागी हिमायतनगरच्या तहसीलदार पल्लवी टेमकर यांना नगरपंचायतीचे मुख्याधिकारी पदाचा पदभार देऊन त्यांना रुजू केले त्यामुळे हिमायतनगर शहरातील असंख्य समस्यांचा डोंगर मुख्याधिकारी पल्लवी टेमकर मॅडम यांच्या समोर राहणार आहे त्यामुळे उपनगराध्यक्ष मोहम्मद जावेद यांच्या शिष्ट मंडळांनी शहरातील असंख्य विषयावर तहसीलदार यांच्याशी चर्चा करून त्या सोडवण्यासाठी पारदर्शकपणे काम करावे अशी विनंती त्यांना केली यावेळी हिमायतनगर नगर पंचायतचे माजी नगरसेवक प्र. सदाशिव सातव, शिवसेना शहर प्रमुख गजानन हरडपकर, सामाजिक कार्यकर्ते फेरोज खुरेशी, एस,डी ,आदिल, इरफान भाई, मोहम्मद जुनेद भाई, पत्रकार नागोराव शिंदे सह आदी जन उपस्थित होते