• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Sunday, June 28, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र औरंगाबाद

छत्रपती संभाजीनगरमध्ये वर्षभरात 57 हजार वीजजोडण्या, जोडणी देण्याचा सरासरी कालावधी आला आठवड्यावर !

Satyaprabha News by Satyaprabha News
9 January 2024
in औरंगाबाद, महाराष्ट्र
32
SHARES
211
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X
img 20240109 233818978719238465382033

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी ! विजय पाटील !
दि : ०९/०१/२०२४
नवीन वीजजोडण्या देण्यासाठी महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलाने वेगवान व तत्पर कार्यवाही करीत 2023 मध्ये सर्व वर्गवारीमध्ये 56 हजार 697 नवीन वीजजोडण्या कार्यान्वित केल्या आहेत. तसेच नवीन वीजजोडण्या देण्यासाठी गतवर्षी लागणारा सरासरी दीड महिन्याचा कालावधीही केवळ एका आठवड्यावर आणण्यात महावितरणला यश आले आहे.

छत्रपती संभाजीनगर परिमंडलामध्ये दरवर्षी 40 ते 50 हजार नवीन वीजजोडण्या देण्यात येतात. मात्र यंदा वीजजोडण्या देण्यास नियोजनपूर्वक वेग देण्यात आला आहे. नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकारने ‘इझ ऑफ लिव्हिंग‍’ संकल्पना आणली आहे. यात वीजपुरवठा हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यानुसार ग्राहकांना सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठ्यासह सर्व सेवा तत्परतेने देण्याचे आदेश महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी कर्मचाऱ्यांना दिले आहेत. यात छत्रपती संभाजीनगर परिमंडलाने नवीन वीजजोडणी तत्परतेने देण्यासह खंडित वीजपुरवठा, बिलिंग व ग्राहकांच्या इतर तक्रारींचा तातडीने निपटारा करण्यात राज्यात आघाडी घेतली आहे.

वीज ही मूलभूत गरज आहे. ही महत्त्वाची गरज भागवण्यासाठी ग्राहकांना फारवेळ लागू नये यासाठी ग्राहकांना नवीन वीजजोडणीसह सर्व सेवा तत्परतेने देण्यावर महावितरणचा भर आहे. छत्रपती संभाजीनगर परिमंडलात मुख्य अभियंता डॉ.मुरहरी केळे यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना प्रलंबित वीजजोडणी देणे, ग्राहकांच्या वीजपुरवठ्याच्या तक्रारी, बिलिंगच्या तक्रारी, इतर तक्रारी निर्धारित कालावधीत निकाली काढणे तसेच वितरण रोहित्र वेळेत बदलणे या पाच मुद्द्यांवर कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. डॉ.केळे यांनी दिलेल्या निर्देशानुसार छत्रपती संभाजीनगर ‍परिमंडलात मिशन मोडवर काम करत वीजजोडण्या देण्यासह तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर ‍परिमंडलात मुख्य अभियंता डॉ.मुरहरी केळे हे गतवर्षी मे महिन्याच्या अखेरीस रूजू झाल्यानंतर नवीन वीजजोडण्यांच्या प्रगतीसह वीजग्राहकांच्या तक्रारींचा व त्यावर केलेल्या उपायांचा नियमित आढावा घेत आहेत. त्यामुळे नवीन वीजजोडणी देण्याची प्रक्रिया अधिक गतिमान झाली व 2023 मध्ये सर्व वर्गवारीतील 56 हजार 697 ग्राहकांना नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे. प्रलंबित जोडण्यांचे अर्जही एका आठवड्यात निकाली काढण्याबाबत संबंधितांना निर्देश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने ठरवून दिलेल्या कालमर्यादेत वीजजोडण्या देण्यावर भर आहे. छत्रपती संभाजीनगर परिमंडलात गतवर्षी मे महिन्यात नवीन जोडण्या देण्याचा सरासरी कालावधी सुमारे 45 दिवस होता. मुख्य अभियंता डॉ.मुरहरी केळे यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर अभियंते, कर्मचाऱ्यांच्या नियमित बैठका घेऊन प्रलंबित जोडण्या तत्परतेने देण्याचे निर्देश दिले. त्यामुळे नवीन वीजजोडणी देण्याची सरासरी कालावधी डिसेंबरअखेरीस केवळ एका आठवड्यावर आला आहे.

2023 मध्ये घरगुती- 41414, वाणिज्यिक- 5 882, औद्योगिक- 1617 आणि कृषि व इतर 7784 अशा एकूण 56 हजार 697 नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या. यामध्ये छत्रपती संभाजीनगर शहर मंडलात 15831, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मंडलात 25927 तर जालना मंडलात 14939 नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत.

वीजग्राहकांना सेवा देण्यासाठी परिमंडलातील सर्व अभियंता, अधिकारी व कर्मचारी कटिबद्ध

सन 2023 मध्ये छत्रपती संभाजीनगर परिमंडलात जवळपास 57 हजार नवीन वीजोडण्या देण्यात आल्या ही समाधानाची व आनंदाची बाब आहे. हा वेग आणखी वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच नियामक आयोगाच्या कृती मानकांनुसार निश्चित केलेल्या कालावधीत वीजग्राहकांना सेवा देण्यासाठी परिमंडलातील सर्व अभियंता, अधिकारी व कर्मचारी कटिबद्ध आहेत.
– डॉ.मुरहरी केळे, मुख्य अभियंता, महावितरण
सत्यप्रभा न्यूज

Previous Post

त्या’ महाविद्यालयांना अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा, आठ दिवसांत प्रस्ताव सादर करण्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांचे निर्देश !

Next Post

Lऑलम्पिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन राज्य क्रीडा दिन म्हणून होणार साजरा

Next Post
image editor output image 313290843 1704824058823

Lऑलम्पिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन राज्य क्रीडा दिन म्हणून होणार साजरा

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • मी सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं होतं. मी शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं होतं, कर्जमाफी नाही. - उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना ठाकरे गट
#UddhavThackeray #SatyaprabhaNews #ShivsenaUBT #Maharashtra #Farmer #LatestNews
  • भरड धान्य खरेदीस मुदतवाढ द्यावी. रमेश कदम पाटील यांची मागणीनांदेड दि. २७ जून: आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने किनवट येथे चालू असलेल्या भरड धान्य खरेदीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी जगदीश बारदेवाड किनवट दौऱ्यावर होते. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या किनवट येथील गोडाऊन मध्ये सदरील खरेदी चालू आहे. आज खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या वाहनांची गर्दी आढळून आली. 30 जून ला खरेदी मुदत संपत असल्याने ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात धास्ती भरली आहे....http://www.satyaprabhanews.com/ramesh-kadam-patils-demand-to-extend-the-deadline-for-purchasing-bulk-grains/12766/?utm_source=instagram-business&utm_medium=jetpack_social
  • चार तासांच्या प्रतीक्षेनंतर दिव्यांग कोसळला; निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांच्या तत्परतेने टळला अनर्थनांदेड दि.२७ जून : जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे मावळते पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या निरोप समारंभासह नवनियुक्त पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या स्वागताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमासाठी सकल दिव्यांग संघटनेचे सुमारे २५ ते ३० दिव्यांग बांधव मावळते व नवनियुक्त पोलीस अधीक्षकांचा सत्कार करण्यासाठी शाल, श्रीफळ, पेढे व पुष्पगुच्छ घेऊन सकाळपासून उपस्थित होते. दिव्यांग बांधव तळमजल्यावरील लिफ्टजवळ प्रतीक्षा करत असल्याची माहिती आयोजकांना तोंडी तसेच लेखी स्वरूपात देण्यात आली होती....http://www.satyaprabhanews.com/after-waiting-for-four-hours-the-disaster-was-averted-by-the-promptness-of-deputy-collector-kiran-ambekar/12763/?utm_source=instagram-business&utm_medium=jetpack_social
  • उद्धव ठाकरे स्वाभिमानी आहेत, कारण ते बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. पण ज्यांनी पक्ष फोडला त्यांच्याबरोबर उद्धव ठाकरे जाऊन मांडवली करतील अशी जर लोकांमध्ये चर्चा असेल तर ती हस्यास्पद आहे. - रोहित पवार, आमदार, राष्ट्रवादी (शप)
#RohitPawar #UddhavThackeray #SatyaprabhaNews #DevendraFadnavis #LatestNews Maharashtra
  • Sanjay Raut On Sanjay Deshmukh : "बैल, गाढव, बकरं विकलं जातं, इथे ५० कोटींना खासदार विकला"
#SanjayRaut #SanjayDeshmuh #SatyaprabhaNews #UddhavThackeray #Washim
  • नैसर्गिक आपत्तीसमोर हार मानायची नाही. एल निनोच्या संकटावर आपण एकजुटीने मात करू. पाऊस कमी पडण्याचे संकट असले तरी सरकार खंबीर आहे. संकटकाळात शेतकऱ्यांना मदत करताना आर्थिक तडजोड केली जाणार नाही. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र
#DevendraFadnavis #Monsoon #SatyaprabhaNews #ElNino #LatestNews Farmers
  • डी लिमिटेशनचा कायदा पास करण्यासाठी भाजपाला अजून 41 खासदारांची गरज आहे. त्याच्यामध्ये 20 खासदार टीएमसीचे आहेत, 6 खासदार ठाकरे साहेबांचे धरले आहेत, अजून 41 खासदार त्यांना पाहिजे. या परिस्थितीत आज खासदाराची किंमत नक्कीच आहे. आताचे प्रेम एकनाथ शिंदे यांच्यावर दाखवले जाते ते फक्त डी लिमिटेशन कायदा पास करण्यासाठी आणि महाराष्ट्रात सत्ता ठेवण्यासाठी आहे, आता ही वेळ निघून गेली की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांना सुद्धा भाजप डच्चू देईल. - रोहित पवार, आमदार, राष्ट्रवादी (शप)
#RohitPawar #UddhavThackeray #SatyaprabhaNews #DevendraFadnavis #EknathShinde Maharashtra
  • समाजसुधारणा करण्यासाठी कोणत्याही सरकारी विकास निधीची किंवा सत्तेची गरज नसते, हे विदर्भातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे बाबा यांनी दाखवून दिले. त्यांनी कोणतेही आमदार-खासदार पद न भोगता केवळ आपल्या समाजकार्यातून लोकांच्या मनात स्थान मिळवले. आज लोक सत्ताधाऱ्यांपेक्षा या संतांना अधिक मानतात. - उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना ठाकरे गट
#UddhavThackeray #ShivsenaUBT #SatyaprabhaNews #Shivsena #Maharashtra LatestNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 548252535 1685356041380

व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

0
image editor output image1726156324 1685356360185

गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

0
image editor output image1783743501 1685356629739

सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

0
मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

0
image editor output image 510237900 1782571113481

भरड धान्य खरेदीस मुदतवाढ द्यावी. रमेश कदम पाटील यांची मागणी

27 June 2026
image editor output image 533325925 1782570472729

चार तासांच्या प्रतीक्षेनंतर दिव्यांग कोसळला; निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांच्या तत्परतेने टळला अनर्थ

27 June 2026
image editor output image 666102728 1782491657814

मागील अनेक वर्षांनंतर वॉर्ड क्र. १६ मध्ये घरपोच कचरा संकलन सेवा पुन्हा सुरू; डॉ. कैलाश भानुदास यादव यांच्या पाठपुराव्याला अखेर यश

26 June 2026
IMG 20260626 203611

हदगाव पंचायत समिती बनली ‘घाणीचे साम्राज्य’ गटविकास अधिकाऱ्याचे दुर्लक्ष…

26 June 2026

Recent News

image editor output image 510237900 1782571113481

भरड धान्य खरेदीस मुदतवाढ द्यावी. रमेश कदम पाटील यांची मागणी

27 June 2026
image editor output image 533325925 1782570472729

चार तासांच्या प्रतीक्षेनंतर दिव्यांग कोसळला; निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांच्या तत्परतेने टळला अनर्थ

27 June 2026
image editor output image 666102728 1782491657814

मागील अनेक वर्षांनंतर वॉर्ड क्र. १६ मध्ये घरपोच कचरा संकलन सेवा पुन्हा सुरू; डॉ. कैलाश भानुदास यादव यांच्या पाठपुराव्याला अखेर यश

26 June 2026
IMG 20260626 203611

हदगाव पंचायत समिती बनली ‘घाणीचे साम्राज्य’ गटविकास अधिकाऱ्याचे दुर्लक्ष…

26 June 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

image editor output image 510237900 1782571113481

भरड धान्य खरेदीस मुदतवाढ द्यावी. रमेश कदम पाटील यांची मागणी

27 June 2026
image editor output image 533325925 1782570472729

चार तासांच्या प्रतीक्षेनंतर दिव्यांग कोसळला; निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांच्या तत्परतेने टळला अनर्थ

27 June 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज