
हिमायतनगर प्रतिनिधी /-
हिंदुहृदय सम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांची पोटा बु. येथील जिल्हा परिषद शाळेत जयंती साजरी करण्यात आली या जयंतीचे औचित्य साधून पो बू. ग्रामपंचायतचे माजी सरपंच प्र.तथा उ.बा.टा.गटाचे शिवसैनिक संतोष पुलेवार यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण करत जिल्हा परिषदेमधील शाळकरी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून बाळासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन केले…
याबाबत सविस्तर वृत्त असे की आज दि 23 जानेवारी रोजी वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती पोटा बू.येथील जिल्हा परिषद शाळेत साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख मान्यवरांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले त्यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिवसैनिक संतोष पुलेवार यांनी असे सांगितले की ज्यांनी देव पाहिले ते संत झाले आणि ज्यांनी साहेब पाहिले ते भाग्यवंत झाले असे महाराष्ट्राचे धुरंदर राजकारणी तथा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून उपस्थितांना मार्गदर्शन केले यावेळी ग्रामपंचायत सदस्या सौ.आश्विनी पुलेवार, युवासेना तालुका प्रमुख योगेश पाटील सोनारीकर , कैलासराव माने, संदिपराव देशमुख, श्रीराम पाटील वाघीकर,वाशी गावच्या सरपंच शिल्पाताई राठोड, युवतीसेना जिल्हा समन्वयक प्राजक्ता गुंडेकर गजानन पाटील सुर्यवंशी, सरपंच दत्तात्रय पवार, दिपक पाटील चव्हाण, गणेशराव माने पोटेकर,दिगांबर ईगंळे,बाळुमामा,खडके,चांदराव माने,पाडुरंग मिराशे,आनंदराव जळपते,रेशमाची जळपते, अशोकराव जाधव, विशाल आललवाड,शेख मुजीप, ग्रामसेवक जक्कीलवाड, अजिंक्य पिन्नलवार,मुंजाजी जळपते यांच्या सह जिल्हा परिषद शाळेतील असंख्य विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते