दत्तात्रय सज्जन
धर्माबाद दि.१७: महाराष्ट्र नाभिक महामंडळ संघटना तसेच सकल नाभिक समाजाच्या वतीने नायगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार तथा माजी आमदार राजेश संभाजी पवार यांना पाठिंबा देत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
गत कार्यकाळात मतदारसंघात केलेली विकासकामे,भरीव निधी, शाळा,दवाखाने,अंगणवाडी,रस्ते नाल्या,पूल,सभामंडप आदी सार्वजनिक बाबींना योग्य निधी उपलब्ध करून देऊन ती कामे पूर्णत्वास नेण्याचे काम त्यांनी चोखपणे पार पाडले. यासोबतच गोरगरिबांच्या अडचणी,शेती समस्या आदी प्रश्नांना प्राथमिकता दिली,आणि कायम थेट जनतेत मिसळून संपर्क कायम ठेवला. त्यामुळे सृजनशील नेतृत्व म्हणून सखल नाभिक समाजाच्या वतीने राजेश पवार यांना पाठिंबा देत असल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे.
#सत्यप्रभा न्यूज #नांदेड














**mitolyn reviews**
Mitolyn is a carefully developed, plant-based formula created to help support metabolic efficiency and encourage healthy, lasting weight management.