जळगाव : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि माजी खासदार सध्या जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर, जळगाव जामोद आणि शेगाव तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. यासह छोट्या व्यावसायिकांचं देखील नुकसान झालं असून त्यांना मदत करण्यात यावी म्हणून राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला अल्टिमेटम दिला आहे. राज्य सरकारनं शेतकऱ्यांना तातडीनं मदत केली नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमात घुसून जाब विचारु असं राजू शेट्टी म्हणाले.
सध्या पक्षाची जी फोडाफोडी सुरू आहे. राजकारणाचा जो खेळखंडोबा सुरू आहे. त्यामुळे सर्वसामान्यांकडे त्यांच्या मूलभूत प्रश्नाकडे सर्वांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सर्व सामान्य मतदार जनतेने विचार करावा….या सर्वांना आता कात्रज चा घाट दाखविण्याची वेळ आली आहे, असं परखड मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी व्यक्त केले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यादरम्यान मुक्ताईनगर येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शेतकर्यांना तात्काळ मदत द्या, अन्यथा पुढच्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमात घुसू असा इशारा देखील राजू शेट्टींनी राज्य सरकारला दिला आहे. शेतकर्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे सत्ताधार्यांसह विरोधकांचेही दुर्लक्ष झाल्याचे नमूद करत ”आठ दिवसांच्या आत नुकसानग्रस्त शेतकर्यांना मदत न मिळाल्यास आपण शासन आपल्या दारी कार्यक्रमात थेट शिरून मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार आहे ” असा इशारा स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर, जळगाव जामोद आणि शेगावमध्ये गेल्या ५० वर्षात झाला नाही असा पाऊस झाला. त्यामुळं नदी नाल्यांना पूर आल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. जनावरं वाहून गेलेत त्यांचा पत्ता लागला नाही. एक जण वाहून गेला, घरांचं मोठं नुकसान झालं आहे. सरकार त्या नुकसानग्रस्त घरामध्ये वास्तव्यास जायला सांगतंय असा संताप राजू शेट्टी यांनी व्यक्त केला. # सत्यप्रभा न्यूज # नांदेड
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!