विजय पाटील
छत्रपती संभाजी नगर दीड.३:
छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या इम्तियाज जलील यांना मुस्लिम मतांच्या विभाजनाची भीती आहे. सर्वाधिक ६८ उमेदवार या मतदारसंघात असून, त्यात २५ मुस्लिम उमेदवार आहेत. त्यामुळे मुस्लिमांच्या मतांच्या विभाजनाचा धोका जलील यांना जाणवू लागला आहे. यासाठी त्यांनी सभा घेऊन मतांचे विभाजन टाळण्याचे आवाहन सुरू केले आहे.
शुक्रवारी (१ नोव्हेंबर) दुपारी नारेगाव भागात जलील यांनी सभा घेतली. दोन दिवसांपासून त्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. गुरुवारी त्यांनी किराडपुरा भागात दर्गाहला भेट दिली होती. त्यानंतर शुक्रवारी नारेगाव गाठले. या ठिकाणच्या सभेत ते म्हणाले, की मुस्लिम उमेदवाराच्या पराभवासाठी अनेक मुस्लिम उमेदवार उभे करण्याचे षडयंत्र विरोधकांनी रचले आहे. त्यांचे मनसुबे हाणून पाडा. पूर्व आणि मध्यमधील उमेदवाराच्या प्रचारासाठी पक्षाचे नेते अकबरोद्दीन ओवेसी लवकरच शहरात येणार असून त्यांची सभा आमखास मैदान येथे होणार असल्याचे जलील यांनी सांगितले.
छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघात २५ मुस्लिम उमेदवारांशिवाय १८ मराठा, ११ दलित, १२ ओबीसी आणि २ ब्राह्मण उमेदवार मैदानात उतरले आहेत. मतांचे विभाजन टाळण्याचे आव्हान जसे जलील यांच्यासमोर आहे, तसेच ते अतुल सावे यांच्यासमोरही आहे. मराठा मतांवर काही उमेदवारांची भिस्त आहे. ४ नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत वेळ असणार आहे. त्यामुळे उमेदवारसंख्या कमी
कशी होईल याकडे महायुती आणि महाविकास आघाडीचे प्रयत्न प्रामुख्याने दिसून आले
#सत्यप्रभा न्यूज # छत्रपती संभाजीनगर
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
			












